June 30, 2025 2:29 pm

लोकशाहीचा 4 था स्तंभ पत्रकार सुरक्षित आहेत का?

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोकशाहीचा 4 था स्तंभ पत्रकार सुरक्षित आहेत का?
ज्येष्ठ पत्रकार संदीप बनसोडे मारहाण प्रकरणी दौंड भारतीय पत्रकार संघाकडून निषेध
धरणे आंदोलन करण्याचा दिला इशारा!

प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो न.84-46-11-91-58

दौंड – पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील जेष्ठ पत्रकार संदीप बनसोडे यांना गाव गुंडांच्या टोळक्याने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सासवड पोलिसांकडून एका गुंडासह त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात विविध कलमा खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे,सदर प्रकरण शुक्रवार दिं 7 रोजी सायंकाळच्या सुमारास घडला असुन बनसोडे हे मामाच्या दुचाकी हून जात असताना त्यांची गाडी थांबवून त्यांना लाथा बुक्क्या व लोखंडी रॉड ने अमानुषपने मारहाण करण्यात आली याप्रकरणी गुन्हा नोंद होऊनही आरोपी अजूनही फरार आहेत त्यांना अटक झालेली नाही
याप्रकरणी भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व शहर यांनी जाहीर निषेध व्यक्त केला लवकरात लवकर आरोपीस अटक करावी व पत्रकारास मारहाण प्रकरणी त्याचेवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मा. भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर,सुरेश बागल,देशमाने महेश पांडुरंग,कडू राजेंद्र वसंतराव,विलास कांबळे, संदीप बारटक्के,विकी ओहोळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!