जायण्टस् वेल्फेअर फाऊंडेशन बालाजी सिटी कपलग्रुप शिरपूर, लक्ष्य सखी, सावित्री सखी, के.व्ही.पी.एस, LSCC यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल जागतिक आरोग्यदिनाचे औचित्य साधत मातोश्री. बनुमाय शाळेत आरोग्यशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आशाताई रंधे व प्रमुख अतिथी म्हणून सौ.सिमा रंधे, सौ.निता सोनवणे, सौ.ज्योती सोनवणे, सौ. प्रिया पाटील, सौ.निशा देवरे उपस्थित होते. आरोग्य तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.खुशबू पाटील, दंतरोग तज्ज्ञ डॉ.निधी अग्रवाल, दंतरोग तज्ज्ञ डॉ.रूपाली देसले, पॅथाॅलाॅजी साठी प्रितम राजपूत यांनी परीश्रम घेतले. आरोग्यतपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नूतन अध्यक्ष -सौ.राजश्री महाजन, सौ.कनिका सुखवानी ,सौ.मानसी बावीस्कर व सचिव- प्रिती बाफना, सभासद -सौ.मिनाक्षी राठी, सौ.शितल कापडणे, सौ.शर्मिला अग्रवाल, सौ.कविता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.