June 29, 2025 4:45 am

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी:चोरीस गेलेले नागरीकांचे ३२ मोबाईल व एक मोटार सायकल असा सहा लाख रूपये किंमतीचे मुद्देमाल केला परत

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी:चोरीस गेलेले नागरीकांचे ३२ मोबाईल व एक मोटार सायकल असा सहा लाख रूपये किंमतीचे मुद्देमाल केला परत

(निलेश गायकवाड )

मा. अंकीत गोयल सो, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी पोलीस दल हे सेवा उपलब्ध करून देणारे व पोलीसांविषयी समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे उददेशाने हरवलेले व चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषनाचे आधारावर शोधुन ते संबंधीत तक्रारदार यांना परत दयावेत अशा सुचना दिल्याने ते शोधण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप
पवार, सहा. पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या होत्या.

त्याअनुशंगाने प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे रूपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने यांना सदरचे मोबाईलचा व मोटार सायकलींचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होता.त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषन व सायबर सेलच्या मदतीने गोवा, गुजरात, कर्नाटक, तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, कोल्हापुर, सातारा, बीड,अहमदनगर, लातुर, उस्मानाबाद अशा जिल्हातुन अॅपल, ओपो, व्हिओ, वन प्लस, सॅमसंग, एम.आय, आय टेल, अशा विविध कंपनीचे एकुण ३२ मोबाईल किंमत रूपये ५,३०,००० /- तसेच एक मोटार सायकल किंमत रूपये ८०,०००/- असा एकुण ६,१०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नागरीकांना परत केलेला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनासामांन्याचे मनामध्ये पोलीसांचे बाबत आदर निर्माण होवुन आत्मविश्वास वाढला आहे.

सदरची कामगिरी मा. अंकीत गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.आनंद भोईटे सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली रूपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार महेश उगले, हसीम मुलाणी, अंकुश माने यांनी केली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!