बोराडी: किसान विदया प्रसारक संस्था संचलित इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी महाविदयालयात स्पार्कल 2023 फ्रेशर पार्टी व वार्षीक स्नहेसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले स्नहेसंमेलनात महाविदयालतील विदयार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यात संस्कृतीक कार्यक्रम व परंपरागत वेशभुषा सादर करुन विदयार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी किसान विदया प्रसारक संस्थेचे सचिव मा. नानासो निशांतजी रंधे, यांनी अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांना बदलत्या युगा सोबत टिकुन राहण्यास व करीअर विषयी मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे म्हणुन किसान विदया प्रसारक संस्थेचे खजिनदार ताईसो आशाताई रंधे, यांनी विदयार्थ्यांना हसत खेळत जीवन जगणे व विदयार्थ्यांनी आपली विचारात्मक गुणवत्ता कशी वाढवीता येईल याविषयी मार्गदर्शन केले तसेच बोराडीचे उपसरपंच मा. आबासो राहुल जी. रंधे, यांनी विदयार्थ्यांना खचुन न जाता खंबीर पणे उभे राहावे व बोराडी गावाच्या वैभवा बदल माहिती दिली तर सदर कार्यक्रमास किसान विदया प्रसारक संस्थेचे व्यवस्थापक मा. श्री. ए. ए. पाटील व एम. ए. एच. कॉलेज ऑफ फार्मसी महाविदयालयाचे प्राचार्य श्री. महेश पी. पवार उपस्थीत होते.
तसेच आय. पी. ई. फार्मसी महाविदयालयाचे प्राचार्य, डॉ. विकास व्ही. पाटील यांनी महाविदयालयाचा प्रगतीचा आलेख उपस्त्थिताना विषद केला. महाविदयालयाचे प्राचार्य, डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. कल्पेश एस. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतीक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मयुर पाटील, प्रा. कल्पेश मोरे तसेच महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमा बददल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष मा. डॉ. भाऊसो तुषारजी रंधे, सचिव मा. नानासो निशांतजी रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच मा. आबासो राहुल जी. रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन ताथ्यासो शशांकजी रंधे, नगरसेवक मा. बाबासो रोहीतजी रंधे, यांनी कौतुक केले.