करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- हल्ली एखाद्या तरुणाचा वाढदिवस म्हणलं की, समोर येते ते वाढदिवसाच्या नावाखाली चाललेले विद्रुपीकरण. ठिकठिकाणच्या चौकातील रस्त्यावरील टू व्हीलरवर केक कापून तो केक न खाता एकमेकांच्या तोंडाला लावून, भल्या मोठ्या आवाजाच्या गलिच्छ भाषेतील शिवीगाळ करत राक्षसी आनंद साजरा करताना आपण पाहतो.
परंतू करमाळा शहारातील युवक व प्रसिध्द उद्योजक आकाश सिंधी यांनी मात्र या सर्व अनावश्यक बाबींना फाटा देत आपला वाढदिवस हा कोणाच्या तरी दैवी आनंदाचा क्षण व्हावा या उदात्त हेतूने श्री देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेत, कोर्टी येथील आश्रम शाळेत परिपूर्ण अन्नदान करीत साजरा केला. तसेच या प्रसंगी त्यांनी वीट येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत समाजाप्रती आपली निष्ठा दर्शवून बाकी युवकांना वाढदिवस अशा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यासाठी प्रेरीत केल्याचे यावेळी दिसले.
यावेळी सिंधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझा मित्र परिवार खुप मोठा आहे. सगळ्यांनी माझ्या वाढदिवसा दिनी भरभरून शुभेच्छा दिल्या. परंतु आजचे सामाजिक कार्य पाहुन सर्वांनी या पुढे आम्हीही अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करू असा निर्धार केल्याने युवकांचे पाऊल या देशाच्या नवनिर्माणाच्या भूमिकेत महत्वाची भुमिका बजावेल अशी आशा यावेळी सिंधी यांनी व्यक्त केली.
मार्मिक समाचारच्या वतीने आकाश सिंधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांचे पुढील सामाजिक वाटचाल यशस्वी होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.