June 30, 2025 2:47 pm

आटोळे व गव्हाणे कुटुंबाची खा.सुप्रिया सुळे यांची सांत्वनपर भेट….

अपनी भाषा में पढ़े! Translate

आटोळे व गव्हाणे कुटुंबाची खा.सुप्रिया सुळे यांची सांत्वनपर भेट….
बारामती (सह- संपादक – संदिप आढाव)

बारामती तालुक्यातील खांडज येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आटोळे व गव्हाणे कुटुंबाच्या मदतीसाठी राष्ट्रवादी पक्षाने पुढाकार घेतला असून खा.सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.
१५ मार्च रोजी शेतातील ब्रिटिश कालीन मेनहोल साफ करताना भानुदास आनंदराव आटोळे, प्रविण आटोळे या पितापुत्रांसह चुलते प्रकाश सोपान आटोळे व शेजारी बापुराव लहुजी गव्हाणे सर्वजण (रा.सांगवी रोड,खांडज) या चौघांचा मृत्यू झाला.यामुळे खांडजसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली होती.
या दुर्दैवी घटनेनंतर प्रथम विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.तसेच खा.सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतली व सांत्वन केले.यावेळी गव्हाणे कुटुंबातील तिन मुली व एका मुलाचे पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत केले जाणार आहे.तसेच आटोळे कुटुंबातील एकाला बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी त्यांच्या महालक्ष्मी उद्योगात खाजगी नोकरीची जबाबदारी घेतली आहे.
शिवाय त्यांना शासनाकडून विविध योजना मिळवून दिल्या जाणार आहेत.बारामती दुध संघ व माळेगाव कारखान्याने त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते दोन्ही कुटुंबांना देण्यात आला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, सचिन सातव, धनवान वदक, रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे, जयदीप तावरे, संदिप जगताप, नितीन आटोळे, करण आटोळे, सुनिल बनसोडे, अॅड.रविंद्र माने इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी आटोळे व गव्हाणे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून भरघोस मदतीचे आश्वासन दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!