June 30, 2025 1:35 am

कुख्यात बुकी अनिल जयसिंगानी तर खासदाराचा सख्खा शेजारी !

अपनी भाषा में पढ़े! Translate

कुख्यात बुकी अनिल जयसिंगानी तर खासदाराचा सख्खा शेजारी !
उल्हासनगरच्या कुख्यात बुकी व त्याच्या मुलीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणविस यांनी १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न व १० कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा मलबार हिल, मुंबई येथील पोलीस ठाण्यात दाखल आहे.
यातील मुख्य आरोपी कुख्यात बुकी अनिल जयसिंगानी व खासदार तसेच मुख्यमंत्री पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे हे कित्येक वर्षे सख्खे शेजारी होते. खासदार शिंदे यांच्या उल्हासनगर -२ गोल मैदान येथील कार्यालयाच्या वरतीच या कुख्यात बुकीचा फ्लॅट आहे. त्याचा शिवसेना प्रवेश झाला त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते व महाराष्ट्र मंत्रीमंडळात मंत्री होत. गोपाळ लांडगे जे आत्ता शिंदे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख आहेत ते मुळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते.या दोघांच्या संमती खेरीज नगराध्यक्ष वा आमदार मातोश्रीची पायरी चढू शकत नसत.त्यामुळे अनिल जयसिंगानी व शिंदे कनेक्शन कोणी नाकारू शकत नाही.
अनिल जयसिंगानी हा कुख्यात बुकी तेव्हापण होता. या इमारीतीत खासदार कार्यालय २०१७ साली सुरू झाले. त्यावेळी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांना शिंदे पिता- पुत्रांनीच आमंत्रित केले होते. अनिल जयसिंगानी हा क्रिकेटचा कुविख्यात बुकी असल्याचे ठाऊक असूनही शिंदे पिता-पुत्रांनी त्याच्या प्रवेशाचा विरोध न करता संमती दर्शवली असल्यास दोष उद्धव ठाकरेंचा कि तत्कालिन जिल्हा प्रमुखाचा ?
अनिल जयसिंगानी याने सर्वच राजकिय नेत्यांशी जवळीक साधली होती. २००२ पुर्वी तो काॅंग्रेसमध्ये होता. २००७ ला त्याने पप्पु कलानीच्या नेतृृत्वाखाली निवडणूक लढवून २००२ ते २००७ या कालावधीत तो उल्हासनगर महापालिकेत राष्ट्रवादीचा नगरसेवक होता.
२०१४ पासून अनिल जयसिंगानी हा फडणवीस यांच्या संपर्कात आला. त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात अनिल जयसिंगानीची मुलगी अनिक्षा ही २०१६ पासून संपर्कात आली. ती २०२३ पर्यंत संपर्कात होती. विषेश म्हणजे याच कालावधीत अनिल जयसिंगानी हा विविध गुन्ह्यात फरार होता. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत एका कुख्यात व फरार बुकीची मुलगी त्यांच्या पत्नीच्या सतत संपर्कात होती, तरी महाराष्ट्राचे गृहखाते झोपा काढत होते का ? गेल्या ९ महिन्यांपासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असूनही एका बुकीच्या मुलीचा गृहमंत्र्यांच्या किचन पर्यंत बिनबोभाट व खुलेआम वावर होत असताना पोलीस व प्रशासनाने सदर बुकीच्या मुलीला ताब्यात घेऊन फरार पित्याच्या ठावठिकाण्यांची चौकशी का केली नाही ? उलट ती फॅशन डिझायनर असल्याचा बनाव करून अमृता फडणवीस यांना महागडे ड्रेस व ज्वेलरी देत होती,ती लाच या प्रकारात मोडत नाही का ? *मला मिळालेल्या माहितीनुसार अनिक्षा ही मुळात फॅशन डिझायनरच नव्हती. तसे असते तर तिचे ऑफिस कुठे होते ? ती आणखीन कुठे कुठे फॅशन डिझानिंग करीत होती ? अमृता फडणवीस व्यतिरिक्त तिचे आणखीन कोण कोण क्लायंट होते ? याची माहिती पोलीसांनी घेतली पाहिजे.*
अनिल जयसिंगानी बाबततची सुरस माहिती पुढेच आहे.२००९ साली एका केस प्रकरणी तत्कलिन आयपीएस अधिकारी अमर जाधव यांनी कारवाई केली असता,अमर जाधव यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगत त्याला पोलीस संरक्षण देणारे गृहमंत्री कोण होेते ? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.
मुख्यमंत्री पुत्र खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे याचे उल्हासनगर येथील गोल मैदान परिसरात भव्य व आलिशान कार्यालय आहे.ही इमारत २०१६ साली बांधण्यात आली. २०१७ साली या इमारतीत खासदार कार्यालयाचे उद्घाटन झाले.
ही इमारत कोणार्कचे पार्टनर मुकेश किमतानीच्यावतीने बिल्डर मोहन छत्री व चंदर यांनी बांधली होती.नंद जेठानी हे कोणार्कचे मुख्य संचालक आहेत.ही कंपनी उल्हासनगर महानगर पालिकेत तसेच महाराष्ट्रात कोट्यावधीची अनेक कंत्राटं घेत असते.या इमारतीच्या तळमजल्यावर खासदारांनी दोन मोठ्या गाळ्यात आपले आलिशान ऑफिस थाटले आहे. त्यावरच अनिल जयसिंगानी फरार होण्याआधी राहत होता. हे कार्यालय उल्हासनगरचे प्रती एकनाथ शिंदे म्हणवणा-या शिंदे समर्थक नेत्याने मध्यस्थी करून मिळवून दिले. मात्र ते खरेदी केले,भाडे तत्वावर घेतले की गिफ्ट म्हणून मिळाले कि अन्य मार्गाने मिळवले,याचा पुरावा हाती लागत नाही. अनिल जयसिंगानीच्या प्रकरणामुळे खासदार शिंदे यांचे कार्यालयही संशयाच्या भोव-यात अडकले आहे. याचा जयसिंगानी प्रकरणाशी कितपत संबंध आहे, हे शोधून काढणे पोलीस यंत्रणेचे काम आहे.
या प्रकरणी उप मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस जे दावे प्रती दावे करीत आहे ते विसंगत आहेत.एका फरारी व कुख्यात बुकीची मुलगी फडणवीस परिवाराशी इतकी सलगी साधते कशी ? हा जांगडगुत्ता पोलीसांच्या गुप्तचर खात्याच्या लक्षात कसा येत नाही ?
आधी १ कोटीची लाच देण्याचाआरोप होतो व नंतर १० कोटीच्या खंडणीच्या मागणीचा आरोप होतो, यातली गुतागुंत लक्षात येत नाही. त्या मुलीने जी गिफ्ट ड्रेस व ज्वेलरी दिली ती त्याच वेळी का नाकारली नाही ? तीपण एक प्रकारची लाचच आहे.
त्या मुलीने जे ऑडियो व्हिडियो दाखवून ब्लॅकमेल केले असे म्हटले जाते ते प्रसारित का केले जात नाहीत ?
त्या मुलीशी इतकी जवळीक करण्याएवढी ती मोठी फॅशन डिझायनर होती का ? मला मिळालेल्या माहितीनुसार ती फॅशन डिझायनरच नव्हती.
फडणवीस हे आपला बचाव करण्यासाठी त्या मुलीला फॅशन डिझायनर म्हणून संबोधित करीत आहेत का ?
*या प्रकरणात अनेक बारकावे आहेत, गुंतागुत आहे. हे प्रकरण वाटते तितके सोप्पे नाही. कधी कधी आरोपीच बचावासाठी फिर्यादी बनतो असा अनुभव आहे. इतक्या वर्षात तक्रार केली नाही व आत्ताच का केली ? ज्या दिवशी पैश्यांची कथित बॅग घरातील बाईकडे दिली तेव्हाच बोभाटा का केला नाही ? यासारखे अनेक प्रश्न व उपप्रश्न निर्माण होत आहेत.त्यामुळे या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पहिजे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
उल्हासनगर
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!