June 30, 2025 12:56 am

दौंड रेल्वे जंक्शन ला संपुष्टात आणून दौंड चे महत्त्व कमी करणाऱ्यांना दौंड तालुका काँग्रेस कमिटी चा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड रेल्वे जंक्शन ला संपुष्टात आणून दौंड चे महत्त्व कमी करणाऱ्यांना दौंड तालुका काँग्रेस कमिटी चा इशारा
दक्षिणेस जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना दौंडला थांबा द्यावा – महासचिव प्रकाश सोनवणे
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. क्र. 8446119158
दौंड – दौंड कॉर्ड लाईन स्टेशन झाल्यानंतर उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक गाड्या कॉड लाईन वरून जात आहे त्याचबरोबर मुख्य रेल्वे स्टेशन वरून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांपैकी खूप कमी गाड्या या दौंड स्थानकावर थांबत आहेत वास्तविक पाहता दौंड हे मोठे जंक्शन सर्व गाड्यांना येथे थांबा देणे खूप आवश्यक आहे कारण दौंडवरून अहमदनगर, सातारा ,इंदापूर, श्रीगोंदा, बारामती, फलटण ,रांजणगाव , शिरवळ अशा अनेक परिसरात जाण्यासाठी योग्य साधन उपलब्ध आहेत अनेक वेळा दक्षिणेकडील रेल्वे विभागाने सुरू केलेल्या गाड्या कारण नसताना थांबत नाहीत याच गाड्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या स्थानकांवर सुद्धा थांबतात तसेच सोलापूर नंतर खूप वेळ छोट्या छोट्या स्थानकांवर पुढे वेळ आहे म्हणून थांबतात.
सोलापूर दौंड रेल्वेचे दुहेरीकरण झाल्यानंतर एक ते दीड तास हा रेल्वे प्रवासाचा वाचत आहे दौंड स्थानकांवर सध्या प्लॅटफॉर्म भरपूर आहे त्यामुळे लोणावळा दौंड शटल सुरू झाली आणि दौंड रेल्वे स्थानकांवर सर्व गाड्या थांबवल्या तर पुणे स्थानकांवरचा किमान पन्नास टक्के बोजा कमी होऊ शकेल. दौंड स्थानकावरून न थांबता सरळ जाणाऱ्या किमान साठ ट्रेन थांबल्या व यातून प्रत्येक गाडीला १०० लोक बसले तर रोज किमान ६००० लोक येता जाता म्हणजे रोज १२००० लोक दौंड शहरात यासाठी येतील त्यांनी फक्त १०० रुपये सरासरी खर्च केले तर रोज किमान १२लाख रुपयांची महिना ३ते ४ कोटींची व वर्षाला किमान ५० कोटींची उलाढाल होऊ शकेल ही उलाढाल रिक्षा चालक , छोटे हॉटेल व्यावसायिक , किराणा दुकानदाराला फायदा देऊ शकेल गरज आहे ती फक्त आपल्या व्यावसायिकांनी आलेले ग्राहकांना फक्त लुटण्याचा प्रयत्न बंद करून त्यांना योग्य दरात तातडीने सेवा पुरवण्याची जबाबदारी पार पाडली की हे पन्नास कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल तुमचीच वाट पाहात आहे.
सकाळच्या 7:05 चे तिकीट 20 rs. तर त्या नंतर असणाऱ्या सर्व शटल,पॅसेंजर चे तिकीट 45 असा दुजाभाव का अशी प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
लवकरात लवकर थांबा देऊन प्रवाशांचा प्रवास सोईस्कर करावा असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा रेल्वे प्रशासनाला इशारा देऊन विनंती करण्यात आली तरी याची नोंद असावी हे सर्वसामान्य दौंड करांची मागणी आहे,असे दौंड तालुका काँग्रेस कमिटी कडून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!