June 30, 2025 7:42 am

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे स्वस्तिक झळकवणार महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार

अपनी भाषा में पढ़े! Translate

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे स्वस्तिक झळकवणार महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार
2024 साठी तयारीला लागण्याचा दिला सल्ला – महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सदाशिव रणदिवे.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. क्र.8446119158
दौंड -(पुणे)- राष्ट्रीय समाजवादी पार्टी पदाधिकारी निवड करण्यात आली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वात फेरबदल करण्यात आले आहेत महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदासाठी मा. सौ अंजली कांबळे यांची निवड करण्यात आली तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी सौ स्मिता देशपांडे यांची निवड जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदासाठी सौ मालिका महंमद शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरावर समाजवादी पार्टीचा स्वस्तिक झळकवण्याचा निर्धार महिला पदाधिकाऱ्यांनी केला असून पिंपरी चिंचवड शहरातील तळागाळातील जनसामान्यांचे प्रश्न समस्या हाताळण्याची घरोघरी जाऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची तयारी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे स्थानिक सर्व राजकारणाला जनता कंटाळलेली आहे आणि या बदलत्या जनमानसाच्या मानसिकतेचा फायदा घेत लोक हिताची काम करण्यासाठी व्यवस्थेमध्ये जाऊन महापालिका सभागृहामध्ये जाऊन ताकतीने जनतेचे प्रश्न आम्ही सोडवू अशी ग्वाही या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष अधिकराव जगताप राष्ट्रीय अध्यक्ष महा गटबंधन मा. मनोज काळसेकर, संस्थापक अमृता भंडारी-आपटे, राष्ट्रीय महासचिव लक्ष्मण चांदेरे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष उत्कर्ष शहा, राष्ट्रीय सचिव अश्विनी दत्ता, राष्ट्रीय निवडणूक प्रभारी अविनाश मुळीक, राष्ट्रीय अध्यक्ष महिला मोर्चा किरण मोहनजी, किसान मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र शेलार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पटनाईक,महाराष्ट्र प्रदेश संघटक रवी कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सदाशिव रणदिवे, महाराष्ट्र प्रदेश सचिव लक्ष्मी कुमावत, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख हेमंत कुमार केळकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पियुषजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष विकास कदम, जेंडर फोरमच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा कदम, महाराष्ट्र प्रदेश निवडणूक अधिकारी महादेव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश शिक्षक आघाडी अध्यक्ष आशिष डोक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बांधकाम कामगार आघाडी शरणाप्पा हळीझोळ, भटके विमुक्त बारा बलुतेदार आघाडी प्रदेशाध्यक्ष यशवंतराव शेळके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्रपट कामगार आघाडी भूषण घोलप, महासचिव अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तन्मय सरवणकर, महाराष्ट्र प्रदेश शॅडो कॅबिनेट अध्यक्ष प्रकाश भारती, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहर विभाग नाना कासार, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी जगन्नाथ कामत पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल जोशी लातूर जिल्हा अध्यक्ष किशोर नागिमे
लातूर शहर अध्यक्ष कार्तिक भुरे,अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार 26 मार्च 2023 रोजी पक्ष कार्यालयात केला जाईल तसेच महाराष्ट्र विधानसभा 2024 आणि पुढील महिन्यात होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभेच्या तयारीची चर्चा या वेळेला होईल, पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिके सह महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदांची तयारी देखील करायची आहे त्या दृष्टीने गटसमित्या नेमल्या जातील. पक्षापुढील आव्हाने संघटनात्मक बांधणी आणि पक्ष निधी या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येईल अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सदशिव रणदिवे यांनी दिली.यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!