June 30, 2025 9:03 pm

बल्लारपूर मधील शहरातील समस्या विषयी श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे निवेदन ….

अपनी भाषा में पढ़े! Translate

बल्लारपूर मधील शहरातील समस्या विषयी श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे निवेदन ….

आज दिनांक 09.03.23 ला बल्लारपूर शहरातील अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन आज बल्लारपूर मधील नगरपरिषद येथील सी.ओ. साहेब विशाल वाघ सर यांना बल्लारपूर मधील समाजसेवी संस्था सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि नं. चंद्रपूर 0000113/2022 (श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर) यांनी बल्लारपूर मधील ज्वलंत प्रश्न हें आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री गोंदिया व चंद्रपूर जिल्हा .यांच्या आदेशाने आज बल्लारपूर शहरातील मधील ज्वलंत प्रश्न जसे की
1. उन्हाळा सुरु होताच देशात सर्वात जास्त तापमान असलेल्या आपल्या चंद्रपूर जिल्यातील बल्लारपूर शहरातील शहरवासियांना सर्व प्रथम पाण्याचा प्रश्न उदभवतो. त्यामुळे शहरातील सर्व हातपम्प त्वरित दुरुस्त करणे. तसेंच शहरांत पाण्याची कमतरता कुठेही पडू न देणे.
2. शहरातील सर्व भटके कुत्रे व मोकाट गायिची योग्य ती व्यवस्था करून देणे. कारण दिनांक 07.03 23 ला बल्लारपूर शहरातील महात्मा गांधी वार्ड येथे 6 वर्षीय चिमुकल्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला चावा घेतलेल्या गालावर एकूण 19 टाके लागले असून, अशी घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून योग्य ती कारवाई करावी.
मा. विशाल वाघ सर सी. ओ. नगर परिषद यांनी आमच्या सर्व मागण्या गंभीरतेने ऐकून घेतले व तातडीने संबधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. या महत्वाच्या बैठकीत श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, माजी नगरसेवक स्वामी रायबरम जी, सुधाकर सिक्का जी, नारायण अण्णा जी, कमल वर्मा जी, श्रावण शिवणकर जी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!