मदनवाडी येथे महिला आरोग्य शिबिरात 253 महिलांनी सहभाग नोंदवला
(निलेश गायकवाड )
पंधरा वित्त आयोगातून महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मदनवाडी व उपकेंद्र तक्रारवाडी यांच्या संयुक्त विद्यामानाने महिला आरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने सौजन्य – भिगवण मेडिकल हॉस्पिटल आय सी यु, शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.
महिलांच्या हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह इत्यादी तपासणी तसेच यावर जन औषधी दिनानिमित्त मोफत औषधे वाटप केले.हिमोग्लोबिन रक्तातील साखर ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या गरोदर मातांना पोषक वाटप करण्यात आले, डोळ्यांची तपासणी मोठी बिंदू निदान व मोफत शस्त्रक्रिया बुधरानी हॉस्पिटल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी 253 महिलांनी सहभाग घेतला डॉ.राहुल जाधव भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल तसेच उपकेंद्र तक्रारवाडी चे डॉ मृदुला जगताप,सरपंच अश्विनी बंडगर, उपसरपंच प्रीती देवकाते, करिष्मा सवाने, शोभा बंडगर, दिपाली ढवळे, माया चितारे,लक्ष्मीबाई बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकाते, कुंडलिक बंडगर,अतुल देवकाते, अमोल बंडगर तसेच मदनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.