June 30, 2025 1:40 am

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुनिल बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार रस्ता रोको आंदोलन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- कांदयाला हमी भाव मिळावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी तसेच वाढती महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले दर कमी करण्यात यावेत, यासाठी सुनिल बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवार दि. 13 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड रस्त्यावरील बायपास चौक येथे हे आंदोलन होणार आहे. तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सांवत यांनी केले आहे.

याबाबत तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कांदयाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्र शासनाने ‘नाफेड’ची केलेल्या घोषणेचे पुढे काय झाले. तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अदयापपर्यंत मदत मिळाली नाही, तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेले डिझेल, पेट्रोल चे वाढलेले दर कमी करण्यात यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या निवेदनावर सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत, बबन जाधव, मनोज गोडसे, प्रदीप हिरडे, रघुनाथ झिंजाडे, मोहन शिंदे, सुरेश जाधव, फारुक जमादार, नवनाथ झिंजाडे, पांडुरंग शिंदे, बापू उबाळे, चंद्रकांत पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सहया आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!