June 29, 2025 7:03 pm

जागतिक महिला दिवस व स्त्री जिवन

अपनी भाषा में पढ़े! Translate

जागतिक महिला दिवस व स्त्री जिवन

आप्पासाहेब कोळी

आज जागतिक महिला दिवस जगातील सर्व महिलांना प्रथम नमन करू महिला दिनाच्या शुभेच्छा ८ मार्च जागतिक महिला दिवस
स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन फार मोठे मोलाचे काम केले आहे यामुळे स्त्रीला पुरुषांप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य भेटले आहे शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई हे आपण बहुदा वाचलेच असेल स्त्रीमुळेच नव्या पिढीला सुरुवात होते. पण याच स्त्रीला आजही कुठेतरी दुय्यम दर्जाचे स्थान प्राप्त आहे. स्त्री दिवसाच्या शुभेच्छा फक्त ८ मार्च याच दिवशी द्यायच्या का ? इतर दिवशींना मानाचे स्थान नको का ?
असा प्रश्न समाजाला का बरं पडत नाही ?
आज समाजात वावरत असताना बहुतेक प्रश्न आपल्यासमोर येतात मग या प्रश्नांना स्त्री का जबाबदार आहे. का ? कुठेतरी तिला हुंड्यासाठी छळले जाते. कुठे मुलगा होत नसेल तरी तिला छळले जाते. प्राचीन भारतामध्ये स्त्री प्रधान संस्कृती होती. पण कालांतराने त्यामध्ये बदल होऊन ती संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती झाली.

अरे संसार संसार । नाही रडणं कुडनं ।

येड्या गळ्यातला हार । म्हणू नको रे लोढणं ।

बहिणाबाई चौधरी या आपल्या संसार कवितेमधून सर्वांना सांगू इच्छिता की स्त्री ही एकनारी शक्ती आहे तिला बळजबरीने आपल्यावर लादली नाही. आहे स्त्री चा सन्मान हाच पुरुषांचा सन्मान होय. कारण ती एक आई आहे ती एक ताई आहे ,ती एक पत्नी आहे.ती एक मुलगी आहे आणि या विश्वाची जन्मदात्री आहे.हे या समाजाने कधी विसरायला नको. आताच आपण पाहत आहोत की स्त्रीभ्रूण हत्याकेली जाते.जन्मला येण्याआधीच स्त्री जातीच्या अभ्रकाला आईच्या गर्भातच मारले जाते.सर्वांना आई हवी असते,बहिण आली असते,पत्नी हवी असते मग का बरं एवढा मोठा पाऊल लोक उचलत असतात येणाऱ्या काळात स्त्रियांना आपण सक्षम बनवायला हवं पण या उलटच सर्व काही होत आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

असा मंत्र आपण म्हणतो मग तो आमलात का नाही आणायचा? पैसा, विद्या, आणि वेळेस त्या पुरुषाला सावरणारी ‘तू’च ना ग… खुद्द सृष्टीनिर्मिती केलेल्या ब्रम्हदेवाने निर्मितीची ताकद जीच्यामध्ये दिली तीही ‘तू’च… मग जडण घडण करणं अवघड आहे.

राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई इत्यादिंच्या पुण्याईने कर्तृत्वाच्या प्रेरणेने प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत, परंतु काही विवाहित महिला आजही चूल आणि मूल या गुंत्यात का अडकल्या आहेत? सर्व प्रकारचे दडपण घेऊन स्त्रिया कशाबशा जगतात. अनेक प्रकारची बंधने त्यांच्यावर लादली गेली आहेत. या बंधनांचे पालन समाजासाठी करायचे? की कुटुंबासाठी? हा प्रश्न अजूनही उलगडला नाहीये !आपल्याला अभिमान वाटावे, असे आपले ज्योतीबांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले. त्यानंतर सावित्रीबाईंच्या मदतीने मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले हे करत असताना, सावित्रीबाईंचा समाजाने खूप छळ केला. त्यांची पाय मागे ओढण्यात आली.त्यांचे विविध कारणाने शोषण केले. त्यांचा छळ केला. परंतु त्या थांबल्या नाही. त्यांचा आदर्श नजरेस ठेवून आपण
लेकी आपण स्वतःच्या व समाजातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, भावनिक, तसेच विकासाचा पाया उंचावला पाहिजे.
माझ्या लेखनीतून
आप्पासाहेब कोळी

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!