रोटरी क्लब भिगवन तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत….
(निलेश गायकवाड )
आज पासून दहावीच्या बोर्डाच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने रोटरी क्लब भिगवन तर्फे भैरवनाथ हायस्कूल भिगवन येथे सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या….
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे,खजिनदार संतोष सवाने, उपाध्यक्ष किरण रायसोनी, संजय खाडे, रणजीत भोंगळे, रियाज शेख,संजय चौधरी, डॉ.अमित खानावरे, निखिल बोगावत, सौ. सारिका सवाणे तसेच भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडे सर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता..