जिल्हा सचिव यांच्या नेतुत्वात काँग्रेसचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्या कर्मचारी सेनेत प्रवेश
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना चे संघटनेचे राज्य अध्यक्ष मां. रविभाऊ शिराळकर साहेब , राज्य सचिव मां.रामकृष्णजी चिखलकर साहेब तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष मां. मोहम्मद वासिक शेख यांच्या आदेशानुसार तसेच संघटनेचे जिल्हा महासचिव अमोलभाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात भद्रावती कंडोली येथील काँग्रेस पक्षाचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नत्थुजी यांच्या शिवसेना खासदार चंद्रकांत जी खैरे साहेब तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेत शिवबंधन बांधुन प्रवेश केला. तसेच भद्रावती वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते भद्रवती तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली या वेडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, शिवसेना तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर
ग्रामपंचायत सदस्य व संघटनेचे जिल्हा सहसचिव संजोग अडबाले भद्रवती कर्मचारी सेना तालुका प्रमुख नुतन लेडांगे चंद्रपूर शाखा अध्यक्ष प्रफुल सागोरे ,शाखा सचिव प्रमोद कोलारकर,सहसचिव अक्षय मेश्राम, सहसचिव राजकुमार हजारे, सहसचिव पंकज इंगोले यांची उपस्थित होती व आपले दैवत स्व. हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्या कामगार संघटना ह्या शिवसेनेचा पाया असल्याने भविष्यात कामगारांचा प्रश्नसाठी त्यांनी झोकून दयावे व संघटना वाढवावी संघटनेच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे खुप खुप अभिनंदन आणि समोरील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…..!