मदनवाडी येथील घरकुलसह इतर प्रलंबित कामे पूर्ण करा:गटविकास अधिकारी विजयकुमार परीट
(निलेश गायकवाड )
भिगवण:घरकुल प्रकरणासह विविध
योजनांचे प्रलंबित कामे लवकर पुर्ण करण्याच्या सुचना गट विकास अधिकारी विजयकुमार परीट
यांनी मदनवाडी येथील ग्रामसेवकांना दिल्या.
विविध कामांसंदर्भात गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी मदनवाडी येथील कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रलंबीत घरकुले तात्काळ पूर्ण करा, बेघर लाभार्थी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरवाडी नंबर 2 या शाळेला भेट दिली.विज्ञान दिनानिमित्ताने सी. व्ही.रमण यांचे प्रतिमा पूजन केले.विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शाळेने विकसित केलेल्या “परसबागेची”पाहणी केली .या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोदकुमार दिनकरराव कुदळे गुरुजी यांचे कौतुक केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी श्री.नानासो बंडगर ,उपसरपंच प्रतिनिधी श्री.राजाभाऊ देवकाते आणि ग्रामसेवक श्री शिवलिंग गाताडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.