प्रशासनावर आखिल भारतीय ओबीसी सेवा संघ आक्रमक,दौंड शहर बंद ची हाक दिली जाणार
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं – 8446119158
दौंड – दौंड शहरात व्यापार पेठेत एकही नगरपरिषदेची मुतारी नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे हाल तसेच खरेदीसाठी आलेल्या महिला वर्गाला लघुशंकेसाठी कोठेही जागा नसल्याने
आखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे राज्य कोअर कमिटीचे सदस्य व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले, यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी दौंड शहर पदाधिकारी यांनी दौंड शहरात नागरिकांना व व्यापाऱ्यांना मुतारी नसल्यामुळे खुप गैरसोय होत आहे व्यापाऱ्यांचे आतोनात हाल झाले आहेत तसेच शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे या प्रश्नासाठी निवेदन देण्यात आले यावेळी नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी गुरव मॅडम तहसीलदार सो.संजय पाटील , तसेच पदाधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बंड, महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा डेंगळे, उपाध्यक्ष मयूर उदावन्त, योगिता जाधव ,कार्याध्यक्ष राहुल मदने, दुर्गा सुरवसे, सचिव नीना जोसेफ, प्रसिद्धी प्रमुख अक्षय अंकुश, सोनल कसुरे, संघटक श्वेता रायकर , दीपाली सोनवणे, मीनल निंबोळे, सुरेखा बगाडे, नवनाथ सोनोने, अंजली कांबळे इ. पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरात लवकर हा विषय मार्गी लागला नाही तर संघाच्या वतीने दौंड शहर बंद ची हाक जिल्हाध्यक्ष यांनी दिली.