July 1, 2025 4:33 am

कुंभारगाव मध्ये विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने राजकीय वातावरण गढूळ: सरपंचांविरोधात उपसरपंचांची तक्रार

अपनी भाषा में पढ़े! Translate

कुंभारगाव मध्ये विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने राजकीय वातावरण गढूळ: सरपंचांविरोधात उपसरपंचांची तक्रार

(निलेश गायकवाड )

कुंभारगाव मध्ये विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गढूळ झाल्याचे दिसत आहे. कुंभारगावाच्या सरपंचांच्या विनयभंग प्रकरणी उपसरपंचांच्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपसरपंच स्वाती भोईटे यांनीही सरपंच व इतर दोघांविरुद्ध विनयभंगाच्या दिलेल्या तक्रारीवरून सरपंच व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सरपंच उज्वला परदेशी यांनी उपसरपंचाच्या पतीवर विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर उपसरपंच स्वाती भोईटे यांनी कर्मचारी अनिल भोई यांना बाहेर का बसविले याचा जाब विचारत सरपंच परदेशी तसेच चंद्रकांत भोई राहुल भोई यांनी शिवीगाळ दमदाटी करून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सदर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवन पोलीस करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!