आमदार झाल्यानंतर प्रथमच सत्यजीत तांबे इंदापुरातील बबिर बुवाच्या दर्शनाला
(निलेश गायकवाड )
नाशिक पदवीधर मतदारसंघ चे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी इंदापूर तालक्यातील रूई येथील राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या बाबीर देवस्थानला भेट देऊन बाबीर देवाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत वडील माजी. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष दुर्गताई तांबे, डॉ. मैथीली तांबे या उपस्थित होत्या.
आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस मधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लडवली होती यामध्ये ते विजयी झाले आज सत्यजित तांबे यांनी आज अनेक ठिकाणी देवदर्शन केले. बाबी र देवाचे दर्शन घेऊन ते पंढरपूर व अक्कलकोट ला रवाना झाले.
यावेळी बाबीर येथे युवक काँग्रेस चे अमोल बंडगर यांच्यासोबत इतर पदाधिकारी व स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष, स्वप्नील सावंत , वीरधवल गाडे, बाबीर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष, अजित मारकड पाटील , रूई गावचे सरपंच उसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सर्व पदाधिाऱ्यांनी सत्यजित तांबे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी बाबीर ट्रस्ट च्या शिक्षण संस्थेला भेट देऊन शिक्षकांचे प्रश्न विधी मंडळात सोडविण्याचे आश्वासन दिले.