June 30, 2025 11:34 pm

जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अखेर गद्दारी केल्याचे जाहीरपणे कबूल केले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अखेर गद्दारी केल्याचे जाहीरपणे कबूल केले.भर दिवसा.दारू न पिता.त्यांच्याच मतदारसंघात .
व्वा! गुलाबराव ! अखेर तुम्ही मान्य केले, कबूल केले, जाहीर केले कि, तुम्ही गद्दारी केली.म्हणजे तुम्ही गद्दार आहातच,असे स्वताच होश हवाशमधे, राजीखुशीने सांगितले.
गद्दारी केली.मराठा माणसाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी तुम्ही गद्दारी केल्याची शेखी मारली खरी.पण आता पुढील विधानसभा निवडणुकीत तुमचा मतदारसंघ मराठा आमदार साठी सोडला तर , आम्ही म्हणू तुमच्यात पाणी आहे.नाहीतर बिनपाण्याची टाकून बोलले कि काय,असा संशय येईल.
तुम्ही फक्त गद्दार असल्याचे कबूल केले असे नाही.एक वेळ बाप बदलू पण बाळ ठाकरेंना सोडणार नाही. पण दोनच दिवसात तुम्ही बदलला हो!
म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंना जाऊन सांगितले कि, यांनी भ्रष्टाचार केला आहे,हे मंत्री पदासाठी लायक नाहीत. तर मंत्री बनवू नका.
गुलाबराव, तुम्ही आता आमदार आहात, मंत्री आहात, पालकमंत्री आहात तर नाच गाणे,नाटक, तमाशा,जलसा बंद करा.आणि कामे करा.आम्ही दाखवतो, तुम्ही तुमच्याच मतदारसंघात काय दिवे लावले?

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!