June 29, 2025 6:10 am

शिरपूर श्रीनगरमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्सावात साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

जगाला संत गाडगेबाबाचा विचारावर चालण्याची गरज-दत्तात्रय मांडोळे

शिरपूर – संत गाडगेबाबांनी केलेल्या समाज प्रबोधनाची संपूर्ण जगाला गरज आहे. त्यामुळे देशात परिवर्तन घडले असे प्रतिपादन व्याख्याते श्री. दत्तात्रय मांडोळे यांनी केले. शिरपूर तालुक्यात व शिरपूर शहरात संत गाडगेबाबा यांचा जयंती निमित्त गाडगे बाबांच्या पुतळ्याचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे यांच्या हस्ते गाडगे बाबांच्या पुतळयाला पुष्पहार घालून पुजन करुन अभिवादन करण्यात आले. व्याख्याते श्री. दत्तात्रय मांडोळे यांचा मा. श्री. डॉ. तुषारजी रंधे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व्याख्याते श्री. दत्तात्रय मांडोळे यांनी संत गाडगेबाबा यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याची माहिती दिली. संत गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन स्वतः गावाची स्वच्छता व विचारांनी मने स्वच्छ केली. गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

गाडगे बाबांनी कधीही कोणाकडून कधीही पाया पडून घेतल्या नाहीत. (आत्ताचे किर्तनकारा सारखे नाही.) त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडले असे दत्तात्रय मांडोळे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासो. एकनाथजी बोरसे, भाऊसो. डॉ. तुषारजी रंधे, मा. महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई रंधे, महिला प्रदेशाध्यक्ष सिमाताई रंधे, नगरसेवक रोहित बाबा रंधे, प्रदेश उपाध्यक्ष अरुण बापू धोबी, भामरे बापू,प्रा.एस.टी.ठाकरे आदि उपस्थित होते.

 

जयंती उत्सव समिती व तालुका अध्यक्ष श्री. उमेश खैरनार, किशोर कुवर, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, महिला मंडळ अध्यक्ष सुरेखाताई बेडीस्कर, महिला मंडळ उपाध्यक्ष दिपालीताई सुर्यवंशी, हर्षालीताई रंधे, पूजा लुंगसे, ज्योती वाघ, कल्पना येशी, अलका येशी, मनीषा भिलाने, वसंतराव सूर्यवंशी, ईश्वर बोरसे, योगेश सैंदाणे, हर्षवर्धन रंधे, प्रियांशु सुर्यवंशी, दिलीप येशी, जितेंद्र बोरसे, भगवान वाघ, मोहन बोरसे, मुकेश शेवाळे, छोटू धोबी, गोलू धोबी, राजेंद्र वाघ, निखिल सुर्यवंशी, हरिओम भिलाणे, हर्षवर्धन बोरसे, मयुर येशी, दिपक सोनवणे, प्रशांत पवार, कल्पेश वाघ, अनिल बोरसे, निलेश बोरसे,जितेंद्र निकम, सुनिल सूर्यवंशी आदिंनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राध्यापक युवराज बेडीस्कर व आभार जितेंद्र बोरसे यांनी मानले.सुरेखाताई बेडिस्कर यांनी संत गाडगे बाबा यांचे कीर्तन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!