MPSC… अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आयोगाने केली घोषणा..
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
अहमदनगर:MPSC…पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलन गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची त्यांची मागणी होती. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचा निर्णय ट्वीट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले.