राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 147 व्या जयंती निमित्त दौंड येथे परिट समाजाकडून अभिवादन
प्रतिनिधी – विकी
मो नं.8446119158
दौंड – संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे महाराज यांची जयंती शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
शहरातील संविधान स्तंभ येथे राष्ट्र संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दौंड पोलीस स्टेशन आवारातील संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले
यावेळी मा.आमदार रमेश थोरात,आप्पासाहेब पवार,.नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे,मा,नगराध्यक्षा शितलताई कटारिया,अमित सोनवणे,शुभम गव्हाणे, आश्विन वाघमारे, रोकडे,गणेश शिंदे, नागेश बेलुरकर,दिपक सोनवणे, अमर जोगदंड,गौरव साळुंके,दिपक विघ्ने,व्यंकटेश गायकवाड
यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. समाजप्रबोधनकार, अस्तित्व दाखवणारे, माणसात देव शोधणारे असे संत गाडगेबाबा यांच्या कार्याला उजाळा दिला.यावेळी संत गाडगे बाबा यांच्या विचारांना मानणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.