करमाळा (सागर गायकवाड) : करमाळा शहरातील फंड गल्ली येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मंडळ असून यावेळी ही त्यांनी पुणे येथील अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बक्षिस मिळवलेल्या ‘मदार’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर यांचा सत्कर करुन बदर यांच्या कार्याला शुभेछा दिल्या.
यावेळी मंडळाचे मार्गदर्शक देवाकाका बरीदे, माजी नगरसेवक अतुल फंड, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद फंड, उपाध्यक्ष कृष्णा सुरवसे, सदस्य उमेश झाकणे, सागर फंड, सिद्धेश्वर फंड, भुषण फंड, अण्णा शिर्के, निलेश पवार, संकेत मोरे, सोनु त्रिंबके, नागेश फलफले, सोमनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.