June 30, 2025 9:20 pm

मदनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन

(निलेश गायकवाड )

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच प्रतिनिधी नानासो बंडगर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच बंडगर यांनी समाजप्रबोधनकार, अस्तित्व दाखवणारे, माणसात देव शोधणारे असे संत गाडगेबाबा यांच्या कार्याला उजाळा दिला.

याप्रसंगी ग्रामपंचायत मा.उपसरपंच राजेंद्र देवकाते,सदस्य तेजस देवकाते, कुंडलिक बंडगर, पत्रकार निलेश गायकवाड यांच्यासह
गावातील समाज बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!