शहरातील बेकायदेशीर विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर काढून टाकावे अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू …..
ऑल इंडिया पॅंथर सेनेचा इशारा
प्रतिनिधी- विकी ओहोळ
मो क्र.8446119158
दौंड- दौंड नगरपरिषद दौंड हद्दीत सन 2000 पासून दौंड नगर परिषदेने अनेक मोबाईलच्या विविध कंपन्यांना मोबाईल टॉवर उभारण्याच्या हंगामी म्हणजेच 1 वर्ष मुदतीसाठी परवानग्या दिलेल्या आहेत सन 2000 पासून बांधकाम विभाग दौंड संचिका गट्टा क्रमांक 32 मोबाईल टॉवर प्रकरणे 1 ते 18 पाहता दौंड शहरातील अनेक टॉवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली आहेत हे संघटनेचा निदर्शनास आलेले आहे सदर बाब ही गंभीर असून यामुळे दौंड नगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे व आर्थिक नुकसान होत आहे नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार दौंड नगरपरिषद आर्थिक नुकसानात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना नगर परिषदेच्या मार्फत मिळणाऱ्या मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे सदर घटनेमुळे दौंड नगरपरिषद ही कोणाच्या इशाऱ्यावर या मोबाईल कंपन्यांना पाठीशी घालत आहे याची कसून चौकशी करण्यात यावी तसेच दौंड नगरपरिषद बांधकाम विभाग संचिका गट्टा क्रमांक 32 नुसार 1 ते 18 मधील बेकायदेशीर मोबाईल कंपन्यांचे टॉवर तात्काळ पाडण्याचे किंवा काढून टाकण्याची कारवाई करण्यात यावी व जे टॉवर कायदेशीर असून आज पर्यंत शासनाचा महसूल बुडवत आहेत त्यांच्याकडून अतिरिक्त दंडासह महसूल वसूल करण्यात यावा अन्यथा सदर बेकायदेशीर टॉवर पॅंथर स्टाईलने काढण्यात येईल जर यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी दौंड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे इशारा वजा निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेना दौंड तालुका अध्यक्ष सागर उबाळे यांनी दौंड नगरपरिषद दौंड ला दिले .