पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आमदार सोबत घेऊन जबरदस्तीने जेवण वाढतो तेव्हा?
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
चिमुर :- अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रतिनिधी बघितले सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असे पद असले तरी तो लोकप्रतिनिधी हा मोठा असतो व समाजात त्यांचे आगळेवेगळे स्थान असते समाजात त्यांचेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो मोठी प्रतिष्ठा असते सर्वसामान्य माणूस त्यांच्या सोबतीला बसताना विचार करतो त्यात आमदार किंवा खासदार असेल तर ती खूप मोठी गोष्ट असते त्या पदाची मोठी प्रतिष्ठा असते काही आमदार यांना भेटायला तर अनेक सामान्य कार्यकर्त्यांना तासनतास वाट पहावी लागते त्यात जेवण वैगेरे म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे.
या सर्व गोष्टींना अपवाद उदाहरण म्हणजे चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा तरुण लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकासपुरुष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया आपल्या विधानसभा क्षेत्रातील चिमूर निवासस्थानी उपस्थित असतांना कार्यकर्ते असले तर ते आधी त्वरित त्यांची भेट घेतात व नंतर बाकीची कामे जेवणाच्या वेळेत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जेवणे हा त्यांचा छंद आहे कधीच ते एकटे जेवण करताना दिसत नाहीत कार्यकर्त्यांनी उपाशी राहू नये म्हणुन ते स्वतःच्या हातांनी जेवण वाढतात त्यांच्यात त्यांना जो आनंद मिळतो त्याच्यात ते धन्यता मानतात त्यामुळे कार्यकर्ते अक्षरशः भाराऊन जातात अशाप्रकारे असामान्य असून सर्वसामान्य जीवन जगणारे लोकप्रतिनिधी आमदार बंटी भांगडिया हे एकमेव असतील,या शब्दाचा अर्थ व महत्व काय असते हे त्यांनी दाखवून दिले.