अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित रक्तदान शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद
खानोटा (स्वप्निल पवार)
अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा खानवटे यांच्या वर्धापन दिनानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून खानवटे या गावामध्ये महारक्तदान शिबिराचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 61 रक्त पिशव्यांचे संकलन झाले यावेळेस खानवटे गावचे ग्रामस्थ व मराठा महासंघाचे कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.एक वर्षामध्ये या ठिकाणी 2 कॅम्प घेतले जातात असे मराठा महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितले यापुढेही अशीच समाज उपयोगी कामे करत राहू असे आश्वासन यानिमित्ताने अध्यक्षांनी दिले अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात असे समाधान ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.