ग्रामपंचायत डिकसळच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
(निलेश गायकवाड )
डिकसळ ग्रामपंचायत च्या वतीने नुकताच हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीनिमित्त संपन्न झाला. यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी श्री योगेश्वरी माता मंदिर डिकसळ या ठिकाणी आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड प्रतिमा ताई अभिजीत भरणे (मुंबई हायकोर्ट ) यांनी सदर महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. डॉक्टर मृदुला जगताप यांनी महिलांना बीपी शुगर कॅन्सर याविषयी व इतर आजारांवर मार्गदर्शन केले. तसेच सरकारचे (आभा कार्ड) याविषयी मार्गदर्शन व ते सर्वांनी काढून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली. सरपंच मनीषा संदीप गवळी या म्हणाले की पुढील काळात देखील महिलांच्या आरोग्य विषयी कार्यक्रम व शिबीर राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थिती
सरपंच मनीषा संदीप गवळी, ग्रामपंचायत सदस्या पूजा गोरख पोंदकुले, ज्ञानेश्वरी देविदास कुंभार, मंदा विजय शिंदे, जयश्री महेंद्र सवाने, मनीषा शरद पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाचे औपचारिक साधून महिलांना तिळगुळ व वाण वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित अश्विनी शिंदे यांनी केले तर,आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्या ज्ञानेश्वरी कुंभार यांनी केले.