हिंदी अध्यापक संघाच्या सलग पाचव्यांदा संचालकपदी – श्री.दिपक वडापुरे.
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाची कार्यकारणीची निवड केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी येथे नुकतीच जाहिर झाली असून विद्या -निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,लाखेवाडीचे श्री. दिपक जगन्नाथ वडापुरे सर यांच्या उपक्रमशील आणि उत्कृष्ट कृतिशील शैक्षणिक योगदानामुळे सलग पाचव्यांदा संचालक या पदासाठी निवड करण्यात आली. तसेच उपक्रमशील स्कूल, कृतिशील शिक्षक व निबंधलेखन स्पर्धामधील गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला .मा.आ.दत्तात्रय सावंत (मा. आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ),मा.डॉ. छाया पाटील
(पूर्व अध्यक्ष, हिंदी भाषा विषय समिती, उच्च माध्य. वि., बाल भारती पुणे ) मा. डॉ. कैलास जाधव(सदस्य, केंद्रीय हिंदी निदेशालय)जिल्हा समन्वयक उस्मान मुलाणी , इंदापूर तालुका अध्यक्ष मुलाणी एस.टी. सचिव भोंग के.डी .एस.एन. भोंग, आर. एस. रणमोडे, प्राचार्य. चंद्रकांत सोळसे, प्राचार्य मचाले सर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.तसेच जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित ,विद्या -निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी
कॉलेजचे अध्यक्ष श्री .श्रीमंत ढोले साहेब, उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव हर्षवर्धनजी खाडे साहेब, संस्थेचे मुख्य सल्लागार श्री.प्रदीपजी गुरव साहेब , प्रशासक श्री .गणेश पवार सर, सर्व विभागप्रमुख यांनी यांच्या निवडीबद्दल व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.