भिगवण-बारामती रस्त्यासाठी वापरलेल्या जागेची मदनवाडी गावातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा-दादासाहेब थोरात
(निलेश गायकवाड )
भिगवण :भिगवण बारामती रस्त्यासाठी वापरलेल्या जागेची मदनवाडी गावातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब थोरात यांनी आंदोलनाचा ईशारा दिला असुन, मदनवाडी गावच्या हद्दीतील रस्त्याच्या बांधकामाचे कामकाज ज्या शेतकऱ्यांच्या जागेत चालु आहे त्या शेतकऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कसलीही भरपाई दिली नाही सदर रस्त्याच्या जागेचा मोबदला दिल्या शिवाय मदनवाडी गावच्या हद्दीतील रस्त्याचे बांधकाम करु नये असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
बांधकाम विभागाने आजपर्यंत आमची जागा विनामोबदला वापरली आहे त्याची देखील भरपाई करण्यात यावी,अन्यथा शेतकरी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी शासनाला पत्राद्वारे कळविले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते,माजी सरपंच तुकाराम बंडगर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, दादासाहेब थोरात, सागर टकले आदी उपस्थीत होते तर भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमच्या जागेत कसलाही फेरफार करु नये असाही पत्रात नमुद केले आहे यामुळे भविष्यात शासन आणि शेतकरी यांच्यात संघर्षाची चित्र आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या मागणीची पुर्तता लवकरात लवकर करावी आणि मदनवाडी गावच्या हद्दीत चालु असलेली वृक्षतोड आणि रस्त्याच्या बांधकामासाठी सपाटीकरण त्वरित थांबवावे, केलेला रस्ता किती मिटर रुंदीचा आहे, रस्त्यासाठी कोणत्या साली किती अधिग्रहण करण्यात आले आहे, कोणत्या कायद्याप्रमाणे करण्यात आले आणि त्याला किती भरपाई देण्यात आली आहे हे स्पष्ट होत नसल्याने आपण रस्त्याचे कामकाज करण्यापुर्वी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समाधान करावे अन्यथा आम्ही आठ दिवसाच्या आत आंदोलन करणार असल्याचा ईशारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिला आहे.
अनेक वर्षांपासुन बांधकाम विभागास रस्त्यासाठी वापरत असल्याने अनेक शेतकरी अल्पभुधारक झाले आहेत, अनेकजण बेरोजगार झाले आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने आपण लवकरात लवकर योग्य विचार करुन आम्हाला न्याय द्यावा असा ईशारा दिला असुन तीव्र आंदोलन करणार असल्याने शेतकरी आणि शासन यांच्यात संघर्षाची चित्र आहेत.