भैरवनाथ विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी औदुंबर कदम तर व्हाईस चेअरमन पदी विद्या शेंडगे यांची बिनविरोध निवड
भैरवनाथ विकास सोसायटीच्या चेअरमन पदी औदुंबर कदम तर व्हाईस चेअरमन पदी विद्या शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या अगोदरचे चेअरमन महादेव झिटे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे निवडणुक जाहीर करण्यात आली. यावेळी औदुंबर कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. निवडणुक निर्णय अधिकारी शितोळे व तावरे यांनी औदुंबर कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी कालिदास कदम, कल्याण शेंडगे,नवनाथ कदम, फुलचंद शेंडगे, अतुल शेंडगे, वाटलूज सरपंच युवराज शेंडगे, महादेव कदम व सचिव शिंदे, दत्ता ससाणे,अनिल कदम व सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.