तांदुळवाडीत भरदिवसा आढळून आला रानगवा
प्रतिनिधी, अजिनाथ कनिचे
तांदुळवाडी- भोईंजे रोडवर गावापासून २ किमी अंतरावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याकडे जात असताना अचानक गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर रानगवा प्राणी आढळून आला.ही घटना
तांदुळवाडी.ता.माढा येथे सकाळी ७:३० वाजता घडली.
सविस्तर माहिती अशी की, गावातील प्रथमेश राजेंद्र गवळी व त्यांचे मोठे बंधू आकाश राजेंद्र गवळी हे सकाळी उठून आपल्या माळावरील जनावरांच्या गोठ्याकडे मोटरसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यालगतच असणाऱ्या सुभाष भुजंग गवळी यांच्या ओढ्या जवळील शेताच्या कडेला रानगवा प्राणी आढळून आला.हा रानगवा रंगाने गडद काळा-भोरा असून त्याची शिंगे आतील बाजूस वळलेली,टोकदार होती.तसेच साधारणपणे तो साडेपाच फूट उंचीचा नर जातीचा प्राणी होता.प्रथमेश व गणेश यांना पाहताच रस्त्यावर थांबलेला रानगवा सुभाष भुजंग गवळी यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ऊसामध्ये निघून गेला असून नंतर तो रिधोरेच्या दिशेने गेला असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा होत आहे.नागरिकांनी सतर्क राहत,आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे असवाहन सरपंच रणजितसिंह पाटील व गाव कामगार पोलिस पाटील पितांबर पाटील यांनी केले आहे.
मी व माझा भाऊ आकाश सकाळी मोटरसायकलवरून गोठ्याकडे जात असताना अचानक सुभाष भुजंग गवळी यांच्या ओढ्या जवळील शेताच्या कडेला रानगवा प्राणी आढळून आला.हा रानगवा रंगाने गडद काळा-भोरा असून त्याची शिंगे आतील बाजूस वळलेली,टोकदार होती.तसेच साधारणपणे तो साडेपाच फूट उंचीचा नर जातीचा प्राणी होता.आम्हांला पाहताच रस्त्यावर थांबलेला रानगवा सुभाष गवळी यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ऊसामध्ये निघून गेला.
—- प्रथमेश गवळी.
प्रत्यक्षदर्शी.
रानगवा किंवा गवा हा हिंस्र प्राणी नसून शाकाहारी व भूचर प्राणी आहे.रानगवा हा सहसा जंगलात कळप करून रहातात.रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो.गव्यापासून नागरिकांनी घाबरून न जाता, गवा जनावरांसोबत राहू शकतो तेव्हा शक्यतो आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.तसेच कोणाला आढळून आल्यास त्वरीत वन विभागाशी संपर्क साधावा.
——- सुरेश कुर्ली.वनअधिकारी, मोहोळ.

