श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे भूगोल दिवस साजरा
प्रतिनिधी रविता कुंभार
डॉ चंद्रशेखर धोंडीराज देशपांडे यांच्या स्मरणार्थ 14 जानेवारी भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. चंद्रशेखर देशपांडे हे शिक्षक ,लेखक व भूगोल तज्ञ होते यांनी भूगोल या विषयाला शास्त्राचा दर्जा मिळून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आज डी आर हायस्कूल येथे भूगोल दिवसानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यध्यापक एन के भदाने सर उपमुख्याध्यापक चौधरी सर प्रवेक्षक पाठक सर दिवाण सर भूगोल प्रमुख हजारे सर व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ एन जी वसावे मॅडम यांनी विद्यार्थीना भूगोल विषयी माहिती देत भूगोल विषयाबद्दलची आवड कशी निर्माण करणार या बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्ष मा.भदाणे सर यांनी मुलांना भूगोल दिवस व मकरसंक्रांती आणी भूगोल यांचा परस्पर सबन्ध व विद्यार्थीनी घ्यावाची काळजी या बद्दल माहिती दिली.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बीएड प्रशिक्षणार्थी शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता चौधरी मॅडम मान्यवरांचा परिचय सरस्वती वसावे मॅडम व आभार प्रदर्शन भाग्यश्री वरसाडे मॅडम यांनी केले तसेच ऋषीकेश अहिरे सर आप्पा कोळी सर उदय अहिरे सर प्रदीप देवरे सर उपस्थित होते.