मदनवाडी रस्त्याचे काम दर्जेदार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश-हनुमंत बंडगर
(निलेश गायकवाड )
भिगवण :मदनवाडी (आनंद हॉटेल ते हनुमान मंदिर )रस्त्याची पाहणी आज मा. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कर्मयोगी साखर कारखान्याचे मा. संचालक रंगनाथ देवकाते व मा. इंदापूर पंचायत समिती सदस्य तुकाराम बंडगर यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्याची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.तसेच रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.
बंडगर व देवकाते यांनी सुरु असलेल्या रस्त्याची कामाची पाहणी करताना अधिकाऱ्यांना धारेवर धरले.रस्त्याचे काम उत्तम व दर्जेदार करण्यात यावे व त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. दर्जेदार कामाबरोबरच वेळेत ते काम पूर्ण करावे जेणेकरुन सामान्य नागरिकांना सुविधा निर्माण होईल अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

अधिकारी टिळेकर व सुर्वे यांनी कामाला योग्य आणि उत्तम दर्जेदार काम करणार असल्याचे सांगितले. तसेच रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात पाणी रस्त्यावर न येता बाजूने गटारी साठी जागा उपलब्ध करून दिली तर रस्ता भविष्यात जास्त काळ टिकेल आणि रस्ता खचणार नाही त्यामुळे अधिकारी वर्गाने देखील पुढे येत असलेल्या अडचणी पदाधिकारी व ग्रामस्थांना सांगून सहकार्य करण्याची विनंती केली.
यावेळी शाखा अभियंता श्रीकांत टिळेकर, उपविभागीय अभियंता मधुकर सुर्वे,मदनवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शरद चितरे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात,दादासो थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.