June 30, 2025 9:12 pm

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा
प्रतिनिधी-एकनाथ भामरे

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे पदाधिकारी सुनिल बागुल यांनी दिली. शुभांगी पाटील यांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात हा निर्णय झाला.

महाविकास आघाडीतल्या पक्षांनीही पाटील यांना पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरे इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याचं बागूल यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुधीर तांबे यांना उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी काल स्पष्ट केलं होतं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!