June 29, 2025 10:50 am

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुलीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे तक्रार – मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट ,नई दिल्ली

अपनी भाषा में पढ़े! Translate

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुलीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे तक्रार – मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट ,नई दिल्ली

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सिमा तपासणी नाके बंध करणे बाबत मागील काही दिवसा पूर्वी आदेश पास करूनही बेकायदेशीर रित्या व शासनाचा आदेश धाब्यावर बसून त्याची अंमलबजावणी न करता, हाडाखेड चेक पोस्ट नाक्या वर संबंधित आर.टी. ओ. हे खाजगी पंटर मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून येत जात असणाऱ्या माल ट्रक,कंटेनर , आयशर , वैगरे वाहनानं कडून बेकायदेशीर पैसे ची वसुली केली जात आहे व वाहन चालक हे आर.टी.ओ.,केबिन मध्ये जाऊन,पंटर लोकांना तसेच आर.टी.ओ. लोकांना पैसे दिले जात आहेत त्या बाबत बरेच वेळा अर्ज देऊन , निवेदन देऊन , व वेळोवेळी शहानिशा करून ही बंद होत नाही . त्यामुळे वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत.व त्याबाबत आम्हास वाहन चालकांच्या तक्रारी येत असतात.हाडाखेड सिमा तपासणी नाका हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्या ना जोडणारा नाका असून मध्यप्रदेशातून येणारे गुरांच्या गाड्या , (बैल,म्हैस,गाई,गुरे तसेच बकरे) यांची वाहतूक होते व तसेच महामर्गा वरून लोडींग माल ट्रका कडून तसेच इतर वाहनानं कडून बेकायदेशीर सर्रास लुट होत आहे .

त्या मागे नेमक्या कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांची साथ व फूस असून पडद्या आड नेमके कोणतेही आर.टी.ओ.अधिकारी तसेच इतर अधिकारी आहेत या बाबत सविस्तर चौकशी व्हावी व महामर्गा वर अवजड वाहणांची देखील (ओव्हरलोड) 12 टायर रु.500 , 14 टायर – रु.700/- ,16 टायर रु.900/- , 18 टायर रु.1100/- तर मोठमोठे कंटेनर पास होण्या साठी रु.2000/- दिले जाऊन वाहने सोडले जात असतात. महाराष्ट्रात अश्या अनेक सीमा तपासणी नाके असून त्यातून भरमसाठ बेकायदेशी पैसा वसूल केला जात आहे. त्यामुळे आर.टी.ओ. चेक पोस्ट वरील अधिकारी , आर.टी.ओ. तसेच इतर शासकीय अधिकारी हे धड होत असून जनते ची अडवणूक करून पिळवणूक करित आहेत. तरी या मागील अधिकारी यांची चौकशी व्हावी व संबंधित आर.टी.ओ. ऑफिस ला तसेच केबिन मध्ये ,तसेच केबिन च्या बाहेर cctv चे कॅमेरे देखील त्वरित बसवण्यात यावे.त्यासाठी देखील मागणी या निवेदना मध्ये केली आहे. तसेच वरील विनंतीस मान देऊन योग्यती कारवाई नाही झाली तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट.नवी दिल्ली सौ.सुधा ताई चौधरी(महाराष्ट्र RTCL) सौ.चंद्रकाला ताई (जिल्हाध्यक्ष) श्री.दिपक चोरमले (महाराष्ट्र युवा सचिव) श्री.जितेंद्र पाटील(जिल्हाध्यक्ष) विभाभाई जोगराना सुनील सूर्यवंशी विजय चव्हाण गणेश बिरारी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!