शिक्षणाच्या नंदनवनाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार…
मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे प्रतिपादन..
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने प्रज्ञावंत शोध परीक्षा संपन्न….
अमळनेर प्रतिनिधी-
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले ,चूल आणि मुल यापलीकडे जग हे ज्यांनी दाखविले त्या शिक्षणाच्या देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलांना प्रेरणादायी आहे. तीच सावित्रीमाई फुले या जगाची शिलेदार आहे असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले.
विचारपीठावर शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के,स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ईश्वर महाजन यांनी केले.
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत प्रज्ञावंत शोध परीक्षा घेण्यात आली. शंभर गुणांची तोंडी व मौखिक परीक्षा घेण्यात आली.शाळेतील सत्तर विद्यार्थीनीं भाग घेतला.
निकाल खालील प्रमाणे
प्रथम- गायत्री रतिलाल भिल(इयत्ता-9वी)
द्वितीय- श्वेता गौतम बैसाणे(इयत्ता-9वी)
तृतीय- भाग्यश्री महेंद्र पाटील(इयत्ता-10वी)
उत्तेजनार्थ-
संजना शिवाजी पाटील (इ.10वी)
हिमांशू रवींद्र पाटील(इ.9वी)
परीक्षकेचे आयोजन अरविंद सोनटक्के यांनी केले तर परीक्षक म्हणून आय.आर महाजन, एच.ओ.माळी यांनी काम पाहिले. परीक्षेला मार्गदर्शन मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने इयत्ता आठवी नववी व दहावीतील 40 विद्यार्थ्यांनी मनोगत व गीत सादर केले.
शाळेचे शिक्षक एच.ओ.माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रज्ञावंत शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी मानले.