भिगवण ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.दिपीका क्षीरसागर तर मदनवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. प्रीती देवकाते यांची निवड
(निलेश गायकवाड )
भिगवण ग्रामपंचायतीचा संरपच पदाचा राजीनामा संरपच तानाजी वायसे यांनी १६ नोव्हेंबर रोजी दिल्याने डिसेंबर अखेर सरपंच पद हे रिक्त होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव असल्यामुळे या पदासाठी ३ जानेवारी रोजी निवड प्रक्रिया घेण्यात आली. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य दिपीका क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने क्षीरसागर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली यादरम्यान ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर मदनवाडी ग्रामपंचायतच्या पदाची निवड प्रक्रिया 03 जानेवारी 2023 रोजी पार पडली.सौ. प्रीती राजेंद्र देवकाते यांची उपसरपंच पदी बिनविरोध करण्यात आली असून सरपंच सौ. अश्विनी मारुती बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून पिसे यांनी काम पहिले.
सरपंच दिपीकी क्षीरसागर क्षीरसागर यांची २०२० साली झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडून आल्या आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर यांच्या गेली अडीच वर्षे सातत्यपूर्ण केलेली कामे त्यांना प्रशासनाबरोबर काम करण्याची कार्यपद्धतीचा चांगला अनुभव आहे. दांडगा जनसंपर्क त्यांचा बेधडक , स्पष्टवक्ता व तत्पर स्वभावामुळे ते प्रचलित आहे. ग्रामस्थांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे कौतुक व शुभेच्छा दिल्या.
