July 1, 2025 3:58 am

एकीकरण समितीच्या बेळगावातल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली

अपनी भाषा में पढ़े! Translate

एकीकरण समितीच्या बेळगावातल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधला महामेळावा रद्द झाल्यावर महाराष्ट्रातल्या नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावला जायचा निर्धार केला होता. मात्र त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखल्यावर नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. हसन मुश्रीफ यांच्यावर थेट काठी उगारण्यापर्यंत कर्नाटक पोलिसांची मजल गेली.

कोल्हापूरमधल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज कोगनोळी टोलनाक्यावरून बेळगावला जायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. गेल्या ६२ वर्षांपासून सीमाभागावर अन्याय होत असल्याने हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!