July 1, 2025 5:01 am

खाकीची सामाजिक बांधिलकी …. पोलिसांनी स्म्शान भूमीत पुरवली लाकडे

अपनी भाषा में पढ़े! Translate

खाकीची सामाजिक बांधिलकी …. पोलिसांनी स्म्शान भूमीत पुरवली लाकडे

पोलीस अधीक्षकाच्या कामगिरीचे कौतुक ….

प्रतिनिधी-महेश सूर्यवंशी
नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून नवापूर येथील स्मशानभूमीत (Cemetery) अंत्यसंस्कारासाठी (Funeral) लाकडेच नसल्याने स्मशानभूमीत आणलेले मृतदेह (Dead Body) ताटकळत ठेवण्यात येत होते. मृतदेहांची हेळसांड होत असलेने मृतांच्या नातेवाईकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त समजताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुख यांनी (Nandurbar Police) नवापूर पोलीस स्टेशनचे (Nawapur Police Station) पोलीस निरीक्षक यांना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या. यावर उपाययोजना करत पोलिसांनी (Nandurbar Police) स्मशानभूमी येथे लाकडे उपलब्ध करुन दिली.

पोलीस अधीक्षकांसह (Nandurbar SP) नवापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे
चार टन लाकडे उपलब्ध करून दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी खोळंबलेल्या मृतदेहांना अग्निडाग मिळाला.
नागपूर परिसरात लाकडे उपलब्ध नसल्याने गुजरात राज्यातून पोलीसांनी ही लाकडे उपलब्ध करुन दिली आहेत.
खाकी वर्धीची अशी सेवा पाहून नवापूर परिसरातील मृतांच्या नातेवाईकांनी साश्रूनयनांनी पोलिसांचे आभार मानले.
नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) मानवाच्या अंतिम प्रवासादरम्यान असा वेगळा माणुसकीचा
धर्म निभावला आहे. मात्र पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police P.R. Patil),
उपअधीक्षक सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hire),
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे (Police Inspector Dnyaneshwar Vare) या पोलीस टीमने हे आपले
कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!