माढा पोलीसांचे तत्परतेने अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलीची चार तासात सुटका.., मुलीस सुखरूप केले तिचे आईचे स्वाधीन…!
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे
माढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. १५/१२/२०२२ रोजी सकाळी १०:३० वा सुमारास मौजे मानेगाव ता. माढा जि. सोलापूर येथील हॉटेल आरोही येथे कामास असलेली महिला मिनल गणेश अहिरे रा. साखरी जि. धुळे सध्या रा. मानेगाव ता. माढा हिची तीन वर्षाची मुलगी जानवी गणेश अहिरे हिस मानेगाव येथील हॉटेल आरोही येथून श्रीकांत शेवाळे रा. अंबाजोगाई जि. बीड याने जबरदस्तीने उचलून कार नंबर एम. एच. ४८ पी ७०६९ यामध्ये टाकून पळवून नेले. लागलीच मुलीची आई मीनल अहिरे यांनी माढा पोलीस ठाणेस धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाणेस फिर्याद दिली. लागलीच माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शाम बुवा यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सर देशपांडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिम्मतराव जाधव सो, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस श्री. किरण घोंगडे सो, सपोफौ भापकर, पोना/ १६६८ निचळ, मपोना /१८६७ आगवणे यांचे एक पथक तयार करून सदर आरोपी बाबत अधिक माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर पथकास आरोपीचा शोध घेऊन मुलीची सुटका करणे कामी रवाना केले. सदर पथकास आरोपी हा युसुफ वडगाव पोलीस ठाणे ता. केज जि. बीड यांचे हद्दीतून जात असलेल्या बाबत तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती मिळाल्याने युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनी दहिफळे व त्यांचे पोलीस पथकास आरोपी बाबत व त्याचे गाडी बाबत माहिती देऊन त्यांचे मदतीने युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतून आरोपी नामे श्रीकांत शेवाळे यास गुन्ह्यात वापरलेल्या कार सह पकडून त्याच्या ताब्यातून अपहरण मुलगी जानवी गणेश अहिरे वय तीन वर्षे हिची त्याची ताब्यातून सुटका करून, तिस माढा येथे आणून सुखरूप पणे तिचे आईचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी श्रीकांत शेवाळे यास अटक करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास स. पो. नि. शाम बुवा यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. फौ. भापकर हे करीत आहेत.

