June 30, 2025 7:46 am

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत मुलींनी मारली बाजी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत मुलींनी मारली बाजी..
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
इंदापूर तालुक्यातील एल.जी बनसूडे येथे नुकत्याच तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या ठिकाणी तालुक्यातील विविध शाळांमधील विविध खेळांसाठी उस्फूर्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या अंगी असणारे क्रीडाभूत कौशल्य दाखवून सर्व खेळाडूंनी आपल्या शाळेचे नेतृत्व नोंदवले.
यावेळी भैरवनाथ विद्यालय भिगवन येथील सतरा वर्षीय वयोगटात विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करत कबड्डी या खेळामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोहण्याचं काम केले . यासाठी त्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडे एस.एम व पर्यवेक्षक श्री काकडे डी.जी तर विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री लकडे टी.डी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!