दादा पाटील महाविद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:दि. २६/११/२०२२ जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या शालेय कबड्डी स्पर्धा वसंत दादा पाटील विद्यालय, अंबिकानगर या ठिकाणी दिनांक २४ व २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयातील खेळाडूंनी १९ वर्षे वयोगट मुले अंतिम सामन्यात समर्थ विद्यालय, कर्जत या संघाचा २२ गुणांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. या विजयी संघाची अहमदनगर जिल्हा पातळी कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाने निवड झाली.
विजयी संघाला महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये खेळाडू शुभम बिटके याने उत्कृष्ट चढाईचे प्रदर्शन केले. तर यश देशमुख व पृथ्वीराज गोरे या खेळाडूंनी उत्कृष्ट पकड केली. व प्रेक्षकांची मने जिंकली. या क्रीडा स्पर्धेसाठी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, अंबालिका साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर मा. सुरेशरावजी शिंदे साहेब, अंबालिका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. विश्वजीत भोसले, अंबालिका प्रतिष्ठानचे सचिव मा. कल्याणराव मोरे उपस्थित होते.
वरील विजय संघाला प्रा. शिवाजीराव धांडे, प्रा. संतोष भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विजय संघाचे आमदार मा. रोहित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्री. राजेंद्र तात्या फाळके तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. अंबादास पिसाळ, मा. बाप्पाजी धांडे, मा. राजेंद्रकाका निंबाळकर यांनी अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.