शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात रुग्णांचे हाल कधी संपणार? मनसे चा अधिष्ठाता यांना संतप्त सवाल..
आशिया खंडातील दोन नंबर व मध्य भारतातील सगळ्यात मोठ्या शासकीय विद्यालय व रुग्णालयाचे खस्ता हाल, आधुनिक उपकरणांची कमतरता, असलेल्या उपकरणांच्या देखभालीत होत असेलेल अक्षम्य दुर्लक्ष, रुग्णांची होत असलेली दैन्या, विद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास अश्या गंभीर विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूर शहराद्वारे निवेदन सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहर अध्यक्ष श्री. विशाल बडगे व श्री. चंदू लाडे तसेच शहर सचिव श्री. घनश्याम निखाडे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता यांच्या अनुपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना निवेदन सादर करून विस्तृत चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान रुग्णालयाच्या दैन्यावस्थेकडे लक्ष वेधून रुग्णालयात येणारा अत्यवस्थ रुग्ण आपल्या पायांनी चालत येत असला तरी बरा होऊन परत जाताना देवाच्या कृपेने जातो असे जनतेकडून उपहासात्मक बोलले जाते जे दुर्दैवी तर आहेच पण रुग्णालयातील डॉक्टर्सच्या कार्यशैली व योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार तसेच त्यांचे मनोधैर्य खच्ची करणार आहे असे स्पष्ट करण्यात आले. विदर्भासह नागपूर सिमेलगत असणाऱ्या तीन राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत रुग्णालयात भरती होत असून रुग्णालयाची एकूण परिस्थिती बघता सगळचं भगवान भरोसे असल्याचे नमूद करण्यात आले. रुग्णालयात असलेला आधुनिक उपकरणांचा आभाव, उपलब्ध कालबाह्य उपकरणांची असलेली दयनीय अवस्था, देखभालीकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हे सगळ दुर्दैवी असून संतापजनक आहे असे नमूद करून निधीबाबत शासकीय पातळीवर कराव्या लागणाऱ्या पाठपुरावठ्याकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त करण्यात आला.
मनसे शीष्ठ मंडळ रुग्णालयाच्या एकूण परिस्थितीची संपूर्ण माहिती घेवून चर्चेस आल्याने गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांचा विषय ह्यावेळी उपस्थित करण्यात आला. जीवन रक्षक प्रणालीच्या (व्हेंटिलेटर) कमतरतेमुळे एका बालिकेचा झालेला मृत्यू व त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जवाबदार ठरवून त्यांच्या झालेल्या बडल्या ही एकूणच नामुष्कीची घटना असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खाजगी दवाखान्यातील कर्मचारी ऍप्रन घालून रुग्णालयात प्रवेश करून रुग्णांना आमीष दाखवून खाजगी रुग्णालयात पळवून नेणे, रुग्णांच्या रक्ताचे तसेच मुत्राचे नमुने खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेणे, रुग्णांना मोफत औषध पुरवठा न करता बाहेरील केमिस्ट कळून औषधे घ्यायला लावणे इत्यादी विषयांवर सखोल चर्चा होऊन ही अनियमितता थांबली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उग्र आंदोलन करून रुग्णांना न्याय मिळवून देईल असा सज्जड धमकी वजा दम वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आला.
रुग्णालयातील उपलब्ध यंत्र व त्यांच्या देखभालीबाबत चर्चा करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अनेक संतापजनक प्रश्न उपस्थित करण्यात आले. निधीअभावी उपकरणांची देखभाल होत नसल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया नोंदविण्यात आली. उपकरणांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत असून तपासण्या खाजगी प्रयोगशाळेत कराव्या लागत असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडत असल्याचे चर्चेत स्पष्ट करण्यात आले. रुग्णालयातील आधुनिक उपकरणांची उपलब्धता वाढविण्यासाठी तात्काळ पावले उचलून शासन पातळीवर निधी उपलब्ध करून घ्यावा व नवीन उपकरणे मगविण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी शिष्ठ मंडळाने केली.
यापूर्वी शासकीय रुग्णालयातील कामात सुरू असलेल्या विविध अनियमितता अनेकदा उघड झाल्या असून त्यावर तात्पुरती कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्ट करत रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या बघता रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे जसे X-Ray Machine, MRI Machine, CT Scan, रक्त व मूत्र तपासणी व्यवस्था इत्यादिंची संख्या वाढविणे , उपलब्ध असलेली उपकरणे सुस्थितीत असणे, उपकरणांची देखभाल व्यवस्थित ठेवणे, वेळोवेळी निधीची उपब्धता करून रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम वैद्यकीय सुविधा देणे याकडे लक्ष देण्याबाबत सुचविण्यात आले.
शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत औषधे देण्यात येत होती जी प्रथा आता अचानक बंद झाल्याची कळते. रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांच्या नावाचे prescription देवून बाहेरून औषधे आणण्याबाबत सांगितले जाते. शासकीय रुग्णालयात अत्यंत गरीब जनता वैद्यकीय सुविधेसाठी येते. अश्यावेळी त्यांना औषधांची यादी देवून औषधे आणायला लावणे हा त्यांच्यावर असलेला आर्थिक बोझा आहे जे कोणत्याही माणुसकीच्या परिभाषेत बसत नाही असे नमूद करून भरती असलेल्या सर्व रुग्णांसाठी मोफत औषधांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
इतक्या मोठ्या वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात पॅरा मेडिकल कर्मचारी तसेच वॉर्ड बॉय, सुशुषा कर्मचाऱ्यांची कमी असणे ही बाब पटण्यासारखी नसून रुग्णालयात पॅरा मेडिकल कोर्सेस सुरू असताना अश्या तज्ज्ञांची कमतरता असणे हे निश्चितच पटण्यासारखे नाही असे नमूद करत सदर गंभीर विषय शासन पातळीवर उचलून तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ हा रुग्णांप्रती अत्यंत असंवेदनशील असून त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. रुग्णांच्या नातेवाईकांकडून घडणाऱ्या अप्रिय घटना टाळण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे व त्याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे सूचित करण्यात आले.
शासकीय निधीच्या कमतरतेमुळे शासकीय विद्यालय व रुग्णालयाची प्रगती व रुग्णांना मिळणारी वैद्यकीय सुविधा जशी पाहिजे तशी होताना दिसत नाही. नागपूर शासकीय रुग्णालयात नागपूर शहराला लागून असलेल्या तीन राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत येत असतात. अश्या परिस्थितीत तिन्ही राज्यांकडून थोड्याफार प्रमाणात निधी मागणे हे नक्कीच अव्यवहार्य नाही. जर त्यांच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना निधी उपलब्ध करून दिला जातो आणि तरीही त्या राज्यातील रुग्ण उत्तम वैद्यकीय सुविधेसाठी आपल्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी येत असतील तर त्यांच्याकडून निधी मागणे हे निश्चितच संयुक्तिक राहिलं असे नमूद करत शिष्ठ मंडळाने केल्या ह्या महत्वपूर्ण मागणीचा विचार करण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले.
शासकीय विद्यालय व रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेबाबत बोलताना एकूण दयनीय परिस्थिती बघता रुग्णालयातील रुग्ण हे अस्वच्छतेमुळे सौंसर्ग होऊन आजारी व्हायची जास्त शक्यता निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच, बायोमेडिकल कचरा ही खूप मोठी व गंभीर समस्या असून त्याच्या विल्हेवाटीसाठी वेगळी अशी व्यवस्था बघावयास मिळत नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला.
निवेदनात सर्व गंभीर विषयांवर तात्काळ सकारात्मक विचार होणे गरजेचे असून शासन पातळीवर विषय लावून धरून त्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे असे स्पष्ट करत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत लागल्यास पक्ष सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही देण्यात आली.
तसेच वरील सर्व गंभीर विषयांवर काय कार्यवाही होणार आहे अथवा केली गेली हे लिखित स्वरूपात कळविण्याबाबत विनंती करण्यात आली.
मनसे शहर अध्यक्ष श्री. विशाल बडगे व श्री. चंदू लाडे तसेच शहर सचिव श्री. घनश्याम निखाडे यांचे संयुक्त निवेदन व त्यानंतर झालेल्या सविस्तर चर्चेत शहर सचिव श्री. श्याम पूनियानी व श्री. रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष श्री. प्रशांत निकम, श्री. उमेश उतखेडे, श्री. महेश माने, श्री. अंकित झाडे तसेच शशांक गिरडे, उमेश बोरकर, गौरव पुरी, अंकुश भेलकर, पराग, अभय व्यवहारे, चांदुभाऊ कडले, जगदीश खरे, श्याम रहांगडाले, मोहित देसाई, कांतेश्वर नगरारे मोठ्या संख्येत वरिष्ठ सहकारी उपस्थित होते.