त्यांनी त्याच्या मृत्यूनंतर ही जपले मैत्रीची नाते
विद्या प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय बारामती येथिल माजी विदयार्थींचा अनोखा उपक्रम
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:विद्या प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय बारामती चा माजी विदयार्थी अभिजित कांबळे, रा. लोणीभापकर, ता. बारामती जि. पुणे यांचे मागील वर्षी अपघातात मृत्यु झाला. त्याच्या पश्चात त्याला एक लहान मूल आहे.
तशी त्याच्या घरची परिस्थिती चांगली आहे.पण आपण एक चांगला विचार करून त्याच्या मुलाच्या भावी आयुष्यासाठी व कुटुंबाला एक आधार आसे त्याच्या विद्या प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय बारामती मित्रांनी ठरवले.म्हणून सर्व त्याचे वर्गमित्र बॅच सन २००९-१० यांनी आपण छोटीशी मदत करूयात ही संकल्पना राबवली.शेवटी संस्कार हे आदरनिय शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान चे रुजलेलेच म्हणावे लागतील.सर्वांनी जमेल तेवढी मदत करत केली.
अभिजितच्या वर्षश्राद्ध दिवशी रोख रक्कम 16110 मदत त्याचे वडील व बंधू च्या हाती देण्यात आली.त्यांनी त्यांना ही रक्कमची मुलाच्या पोस्टात पोलिसी करण्याची विनंती केली .
अभिजितच्या वर्षश्राद्ध दिवशी आपल्या वर्गमित्राच्या आठवणींनी पाणवलेल्या डोळयांच्या डबडबणाऱ्या कडा त्यांना बांद रोखु शकल्या नाहीत.व या दिवशी अभिजितच्या वर्गातील मित्र उपस्थीत राहिले हे पाहुन त्याच्या आई-वडीलांच्या डोळयांत पाणी चटकन आलं.