June 30, 2025 1:03 am

इंदापूर तालुक्यातील स्थगिती दिलेल्या कोट्यावधींच्या कामाला मंजूरीसाठी भरणे प्रयत्नशील

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर तालुक्यातील स्थगिती दिलेल्या कोट्यावधींच्या कामाला मंजूरीसाठी भरणे प्रयत्नशील

(निलेश गायकवाड )

पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी दि.०५ जून २०२२ रोजी इंदापूर तालुक्यामधील मंजूर केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांना शिंदे-फडणवीस सरकारे स्थगिती दिली आहे.या स्थगिती मुळे इंदापूर ताकुक्यातील प्रलंबित असणारी अनेक विकास कामे ही अडकून पडली आहेत. या स्थगिती देण्यात आलेल्या विकास कामांना जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांकडे केली आहे.

सोमवारी दि.१७ आँक्टोबर रोजी विधानभवन पुणे येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.या बैठकीत संबंधित मागणीचे लेखी निवेदन आमदार भरणे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांकडे दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!