स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित समर्थ निसर्गोपचार केंद्र कोऱ्हाळे बुद्रुक
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर मदनवाडी येथे पार पडले. यामध्ये मध्ये 150 महिला व पुरुष यांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन तपासणी औषधोपचाराचा लाभ घेतला.
तसेच आता पर्यंत संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट यांनी बोलताना सांगितले.महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, विस्तार अधिकारी बंडगर साहेब,कर्मयोगीचे संचालक विश्वास देवकाते,माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते,मदनवाडी सोसायटीचे चेरमन विष्णू देवकाते, संचालक सर्जेराव देवकाते, ग्रामपंचायत सदस्य अनिल नरुटे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश नरुटे, जाफरभाई मुलाणी संस्थेचे सचिव धीरज सोट पाटील पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. किरण शेडगे पाटील ( M.D. E.M.S. B.H.M.S.), डॉ.सौ. विद्या जगताप (ND निसर्गपचार तज्ञ), धनराज गावडे (निसर्गपचार तज्ञ), राहुल गावडे, संतोष जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
