भिगवन च्या उपसरपंच पदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी भगवान लोंढे
भिगवन च्या उपसरपंच पदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत मौजे भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे करण्यात आली शितल शिंदे यांनी ठरलेल्या वेळेत उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले होते या पदासाठी शुक्रवार दिनांक 07/10/2022रोजी निवडणूक घेण्यात आली परंतु मुमताज शेख यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी उपसरपंच पदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले या पदासाठी भिगवन गावचे सरपंच तानाजी वायसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली व नवनिर्वाचित उपसरपंच मुमताज शेख यांचा सत्कार करण्यात आला निवडीनंतर बोलताना मुमताज शेख यांनी सांगितले की मी मा सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना विश्वासात घेऊन भिगवन चा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रमिला जाधव अशोक शिंदे अभिमन्यू खटकेअजित क्षीरसागर मानसिंग जाधव संजय रायसोनी पराग जाधव संजय देहाडे जावेद शेख माऊली भरणे जयदीप जाधव तुषार क्षीरसागर दत्ता धवडे कपिल भाकरे सत्यवान भोसले व आप्पा पवार अमित वाघ मच्छिंद्र खडके आबा काळे प्रतिमा देहाडे दीपिका क्षीरसागर ज्योती धवडे निर्मला पांढरे सईबाई खडके ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
