पिंपरी बुद्रुक गावात माता तुळजाभवानी या देवीचा दशहरा गावच्या पारंपारिक रीतीने पडला पार.
दिनांक: ०६/१०/२०२२
पिंपरी बुद्रुक प्रतिनिधी : समाधान रजपूत.
पिंपरी बुद्रुक येथे तुळजाभवानी मातेचा छबिना उत्सव ,,, विजयादशमी दसऱ्यानिमित्त तुळजाभवानी मातेचा सिमोलगण सोहळा संपन्न झाला तुळजाभवानी मंदिर येथून छबिना गावातील सर्व देवतांना भेटून आणल्या दरम्यान रामायण ग्रंथाचे वाचन चालू होते त्या ठिकाणी गावचा छबिना थोडक्यात मातेचे शिलंगण खेळत असताना आराधी मंडळ तसेच गावात च्या बाहेरून येणाऱ्या माणसांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी करून दशहराचा आनंद घेतला. त्या ठिकाणी तुळजाभवानी माता व प्रभू राम यांची भेट झाली या प्रसंगी पिंपरी गावचे प्रतिष्ठित नागरिक व उच्च वरिष्ठ नागरिक जमले होते पिंपरी गावचे पोलीस पाटील वर्धमान बोडके, तसेच सध्याच्या वर्षी नायब तशिलदार झालेलेअमोल दयानंद रजपूत यांचे चुलते रामहरी रजपूत, बाळासाहेब घाडगे, संदीपान पडळकर, सतिश कोळी, महादेव सुतार, शंकर बोडके, सोमनाथ चौगुले, महेश सुतार, अनिल पाटील संजय मोरे व गावातील अराधी मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नवरात्र उत्सव सोहळा संपन्न झाला.